हिंगणा: रायपूर युको बँकेच्या मागे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
Hingna, Nagpur | May 26, 2026 पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत,युको बँकेचे मागे, रायपुर, येथे एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचे, रंग सावळा, चेहरा गोल, बांधा सडपातळ, उंची अंदाजे ५ फुट २ इंच, हे व्यक्ती मृत अवस्थेत मिळुन आले. त्यांना पोलीसांनी उपचाराकरीता एम्स हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही.याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सुचनेवरुन पोलीस ठाणे हिंगणा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.