शहादा: मुलगी झाली व माहेरून पैसे आणावेत यासाठी मनरद येथील विवाहितेचा सासरी टाकरखेडा येथे छळ, २ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील मनरद येथील २६ वर्षीय विवाहितेचा मुलगी झाली व माहेरुन रसवंतीचे मशीन घेण्यासाठी १ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील पती मनोहर भगवान व दीर कैलास भगवान कुवर यांच्याविरुद्ध विवाहितेच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात १ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.