शहादा: डोंगरगाव चौफुली जवळील भाऊ तात्या पेट्रोल पंपाच्या बाजूला २ जणांकडून गुटखा जप्त, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
दिनांक २९ फेब्रुवारी रोजी शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीजवळील भाऊ तात्या पेट्रोल पंपाच्या बाजूला २ जणांकडून शहादा पोलिसांनी गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. सचिन दिलीप रावताळे (रा. साळी गल्ली, शहादा) व संजय निंबा चौधरी (शिवराम नगर, शहादा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ७५ हजाराचा गुटखा व २५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा ३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.