शहादा: बँकेतून काढलेली एक लाखांची रोकड अक्षरधाम येथून डिक्कीतून चोरट्यांनी लांबवली
शहादा तालुक्यातील वरुळ कानडी येथील राजेंद्र पाटील यांनी शहादा शहरातील युनियन बँकेतून काढलेली एक लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून नातेवाकांकडे नवीन घर पाहण्यासाठी अक्षरधाम येथे गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकीचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले एक लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.