शहादा: भारतीय ट्रायबल टायगर सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा याबाबत निवेदन
नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय ट्रायबल टायगर सेनेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना आदिवासी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणेबाबत व नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते, उड्डाणपुल, चौक, उद्याने यांना आदिवासी स्वातंत्र्यवीराची नांवे देणेबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे, स्तेपण वसावे, वसंत चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.