शहादा: म्युनिसिपल हायस्कूलच्या नवीन दुरुस्तीसाठी आमदार राजेश पाडवी यांना विनोद जैन आणि पदाधिकाऱ्यांचे निवेदन
शहादा येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या इमारतीची भयानक दुरावस्था झाली असून नविन इमारती कामासाठी शासन दरबारी त्वरित पाठपुरावा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन यांनी शहराच्या वतीने आ. राजेश पाडवी यांच्याकडे करण्यात आली आहे. नादुरुस्त इमारत त्वरित दुरुस्त करून पुढील अपघात टाळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, जिल्हा सचिव कमलेश जांगीड, भाजपा युवा मोर्चा शहर महामंत्री प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.