Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

ब्रिगेडियरचा बनाव करून वावरत होता तरुण; बनावट गणवेशासह पोलिसांच्या जाळ्यात... . . शाहजहानपूर (उत्तर प्रदेश): शाहजहानपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीत एका २२ वर्षीय बोगस लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आर्यन वर्मा (रा. दुर्गा इन्क्लेव्ह, रोजा) असे या आरोपीचे नाव असून, तो थेट भारतीय लष्कराच्या 'ब्रिगेडियर'ची बनावट वर्दी घालून शहीद संग्रहालयात विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून पोहोचला होता. गेल्या दोन महिन्यांपासून संशयास्पद हालचालींमुळे तो पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट लष्करी वर्दी, बनावट पिस्तूल आणि बनावट ओळखपत्र (आयकार्ड) जप्त केले आहे. धक्कादायक म्हणजे त्याने आपल्या कारच्या काचेवर 'आर्मी' आणि 'डॉक्टर' असेही लिहून ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. . . . #Shahjahanpur #CrimeNews #FakeArmyOfficer #UttarPradeshPolice #BreakingNews #ArmyImpactor #CrimeUpdate #FakeBrigadier #SocialMediaNews

Haveli, Pune | Jun 14, 2026

MORE NEWS

४० वर्षांनंतरही जपली सामाजिक बांधिलकी; लोणी काळभोर येथील माजी विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांटची भेट

लोणी काळभोर, ता. २३ : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटली तरी जन्मभूमी, समाज आणि संस्कारांची नाळ कायम जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कवडीपाट येथील 'समर्पण वृद्धाश्रम' येथे जलशुद्धीकरण यंत्रणा (आरओ वॉटर फिल्टर प्लांट) बसवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
.
.
.
#40YearsOfFriendship
#HelpingHands
#SeniorCitizenCare
#GivingBackToSociety
#SchoolFriendsForever
#AlumniGivingBack
#SocialResponsibility
#LoniKalbhor
#OldAgeHomeSupport
#InspirationalStories

४० वर्षांनंतरही जपली सामाजिक बांधिलकी; लोणी काळभोर येथील माजी विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांटची भेट लोणी काळभोर, ता. २३ : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटली तरी जन्मभूमी, समाज आणि संस्कारांची नाळ कायम जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कवडीपाट येथील 'समर्पण वृद्धाश्रम' येथे जलशुद्धीकरण यंत्रणा (आरओ वॉटर फिल्टर प्लांट) बसवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. . . . #40YearsOfFriendship #HelpingHands #SeniorCitizenCare #GivingBackToSociety #SchoolFriendsForever #AlumniGivingBack #SocialResponsibility #LoniKalbhor #OldAgeHomeSupport #InspirationalStories

Haveli, Pune | Jun 24, 2026

"पोलीस आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली" उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांचा गंभीर आरोप...
.
.
उरुळी कांचन: "पोलीस प्रशासन आणि शेजारच्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आता माझ्यावर कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली आहे," असा खळबळजनक आणि गंभीर आरोप उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांनी केला आहे. वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने आणि त्यातच पोलिसांकडून असहकार्य किंवा उलट त्रास होत असल्याचा आरोप करत खलसे कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. बळीराजाला आपल्याच हक्कासाठी जर अशा प्रकारे कुटुंबासह मृत्यूला कवटाळण्याची भाषा करावी लागत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून संदीप खलसे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल.
.
.
.
#UruliKanchan | #PuneCrime | #FarmerJustice | #PunePolice | #SandeepKhalse | #MaharashtraFarmers | #UruliKanchanNews | #CrimeNews | #बळीराजा | #मराठीबातम्या

"पोलीस आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली" उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांचा गंभीर आरोप... . . उरुळी कांचन: "पोलीस प्रशासन आणि शेजारच्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आता माझ्यावर कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली आहे," असा खळबळजनक आणि गंभीर आरोप उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांनी केला आहे. वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने आणि त्यातच पोलिसांकडून असहकार्य किंवा उलट त्रास होत असल्याचा आरोप करत खलसे कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. बळीराजाला आपल्याच हक्कासाठी जर अशा प्रकारे कुटुंबासह मृत्यूला कवटाळण्याची भाषा करावी लागत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून संदीप खलसे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल. . . . #UruliKanchan | #PuneCrime | #FarmerJustice | #PunePolice | #SandeepKhalse | #MaharashtraFarmers | #UruliKanchanNews | #CrimeNews | #बळीराजा | #मराठीबातम्या

Haveli, Pune | Jun 24, 2026

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील रांजणगाव गणपती हद्दीतील लांडे वस्ती परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अपघाताची घटना घडली आहे. 

पाटस येथून सिमेंटच्या बॅगा भरून भीमाशंकरकडे निघालेला ट्रक रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखालील सुमारे दहा फूट खोल चारीत पलटी झाला.अपघात इतका भीषण होता की ट्रकने रस्त्यालगत उभा असलेला वीज खांब उखडून टाकला आहे. 

त्यामुळे वीज तारा तुटून मोठे नुकसान झाले असून परिसरातील चार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असुन 
या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
.
.
.
#RanjangaonGanpati #AshtavinayakHighway #TruckAccident #PowerOutage #ShirurNews 
#BhimashankarHighway
#LandeVasti
#ShirurTaluka
#PuneAhmednagarHighway
#AccidentProneZone

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील रांजणगाव गणपती हद्दीतील लांडे वस्ती परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अपघाताची घटना घडली आहे. पाटस येथून सिमेंटच्या बॅगा भरून भीमाशंकरकडे निघालेला ट्रक रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखालील सुमारे दहा फूट खोल चारीत पलटी झाला.अपघात इतका भीषण होता की ट्रकने रस्त्यालगत उभा असलेला वीज खांब उखडून टाकला आहे. त्यामुळे वीज तारा तुटून मोठे नुकसान झाले असून परिसरातील चार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असुन या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. . . . #RanjangaonGanpati #AshtavinayakHighway #TruckAccident #PowerOutage #ShirurNews #BhimashankarHighway #LandeVasti #ShirurTaluka #PuneAhmednagarHighway #AccidentProneZone

Haveli, Pune | Jun 24, 2026

"धायरीकर हतबल! वाहतुकीचा बोजवारा आणि प्रशासकीय अनास्था कधी संपणार?"
.
.
"धायरीतील वाहतुकीची कोंडी आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. पर्यायी रस्ते वेळेत पूर्ण न झाल्याने सामान्य नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. आजची परिस्थिती पाहता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन ढिम्म आहे. धायरीकरांच्या या हतबलतेची आणि संतापाची दखल पालिका आणि लोकप्रतिनिधी कधी घेणार? 
.
.
.
#DhayriTraffic | #PuneTraffic | #DhayriNews | #PuneMunicipalCorporation | #PMC | #DhayriKar | #TrafficJam | #PuneInfrastructure | #मराठीबातम्या | #धायरी_वाहतूक_कोंडी

"धायरीकर हतबल! वाहतुकीचा बोजवारा आणि प्रशासकीय अनास्था कधी संपणार?" . . "धायरीतील वाहतुकीची कोंडी आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. पर्यायी रस्ते वेळेत पूर्ण न झाल्याने सामान्य नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. आजची परिस्थिती पाहता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन ढिम्म आहे. धायरीकरांच्या या हतबलतेची आणि संतापाची दखल पालिका आणि लोकप्रतिनिधी कधी घेणार? . . . #DhayriTraffic | #PuneTraffic | #DhayriNews | #PuneMunicipalCorporation | #PMC | #DhayriKar | #TrafficJam | #PuneInfrastructure | #मराठीबातम्या | #धायरी_वाहतूक_कोंडी

Haveli, Pune | Jun 24, 2026

"कायदा फक्त सामान्यांसाठीच? काळ्या काचा, फॅन्सी नंबर आणि पोलिसांचा सपोेर्ट... कोण आहेत हे गुरुजी?"
.
.
नगर-पुणे रोडवरून एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. कुठल्यातरी मठाचे प्रमुख असलेल्या एका 'गुरुजींची' अलिशान पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (MH 14 LY 1957) गाडी बेकायदेशीरपणे सायरन वाजवत, रस्त्यावरील इतर वाहनांना आणि सामान्य नागरिकांना जीवघेणे कट मारत आळंदीच्या दिशेने सुसाट निघून गेली.

आरटीओ (RTO) नियमांची ऐशीतैशी करत या गाडीला पूर्णपणे काळ्या काचा (Tinted Glass) लावण्यात आल्या आहेत, तसेच नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर (888) आणि बेकायदेशीरपणे सायरन लावले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा नागरिकांनी त्यांना टोकले, तेव्हा गाडीतून उतरलेल्या समर्थकांनी चक्क गुंडांसारखी दहशत माजवण्यास सुरुवात केली!

"सामान्य माणसाने सीट बेल्ट लावला नाही किंवा हेल्मेट घातले नाही तर हजारो रुपयांचा दंड ठोकणारे पोलीस आणि आरटीओ खाते अशा मस्तवाल गुरुजींवर आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? की व्हीआयपी (VIP) संस्कृतीच्या नावाखाली या मग्रुरीला अशीच मुभा दिली जाणार?"

भगवे कपडे घालून आणि मठाचे नाव सांगून रस्त्यावर दादागिरी करणाऱ्या या तथाकथित 'गुरुजींवर' आणि त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असलाच पाहिजे!
.
.
.
unePolice #RTOMaharashtra #VIPCulture #NagarPuneHighway #TrafficRules #EqualLaw #PuneNews #SocialMediaViral #मराठीबातम्या

"कायदा फक्त सामान्यांसाठीच? काळ्या काचा, फॅन्सी नंबर आणि पोलिसांचा सपोेर्ट... कोण आहेत हे गुरुजी?" . . नगर-पुणे रोडवरून एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. कुठल्यातरी मठाचे प्रमुख असलेल्या एका 'गुरुजींची' अलिशान पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (MH 14 LY 1957) गाडी बेकायदेशीरपणे सायरन वाजवत, रस्त्यावरील इतर वाहनांना आणि सामान्य नागरिकांना जीवघेणे कट मारत आळंदीच्या दिशेने सुसाट निघून गेली. आरटीओ (RTO) नियमांची ऐशीतैशी करत या गाडीला पूर्णपणे काळ्या काचा (Tinted Glass) लावण्यात आल्या आहेत, तसेच नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर (888) आणि बेकायदेशीरपणे सायरन लावले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा नागरिकांनी त्यांना टोकले, तेव्हा गाडीतून उतरलेल्या समर्थकांनी चक्क गुंडांसारखी दहशत माजवण्यास सुरुवात केली! "सामान्य माणसाने सीट बेल्ट लावला नाही किंवा हेल्मेट घातले नाही तर हजारो रुपयांचा दंड ठोकणारे पोलीस आणि आरटीओ खाते अशा मस्तवाल गुरुजींवर आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? की व्हीआयपी (VIP) संस्कृतीच्या नावाखाली या मग्रुरीला अशीच मुभा दिली जाणार?" भगवे कपडे घालून आणि मठाचे नाव सांगून रस्त्यावर दादागिरी करणाऱ्या या तथाकथित 'गुरुजींवर' आणि त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असलाच पाहिजे! . . . unePolice #RTOMaharashtra #VIPCulture #NagarPuneHighway #TrafficRules #EqualLaw #PuneNews #SocialMediaViral #मराठीबातम्या

Haveli, Pune | Jun 24, 2026