"कायदा फक्त सामान्यांसाठीच? काळ्या काचा, फॅन्सी नंबर आणि पोलिसांचा सपोेर्ट... कोण आहेत हे गुरुजी?"
.
.
नगर-पुणे रोडवरून एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. कुठल्यातरी मठाचे प्रमुख असलेल्या एका 'गुरुजींची' अलिशान पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (MH 14 LY 1957) गाडी बेकायदेशीरपणे सायरन वाजवत, रस्त्यावरील इतर वाहनांना आणि सामान्य नागरिकांना जीवघेणे कट मारत आळंदीच्या दिशेने सुसाट निघून गेली.
आरटीओ (RTO) नियमांची ऐशीतैशी करत या गाडीला पूर्णपणे काळ्या काचा (Tinted Glass) लावण्यात आल्या आहेत, तसेच नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर (888) आणि बेकायदेशीरपणे सायरन लावले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा नागरिकांनी त्यांना टोकले, तेव्हा गाडीतून उतरलेल्या समर्थकांनी चक्क गुंडांसारखी दहशत माजवण्यास सुरुवात केली!
"सामान्य माणसाने सीट बेल्ट लावला नाही किंवा हेल्मेट घातले नाही तर हजारो रुपयांचा दंड ठोकणारे पोलीस आणि आरटीओ खाते अशा मस्तवाल गुरुजींवर आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? की व्हीआयपी (VIP) संस्कृतीच्या नावाखाली या मग्रुरीला अशीच मुभा दिली जाणार?"
भगवे कपडे घालून आणि मठाचे नाव सांगून रस्त्यावर दादागिरी करणाऱ्या या तथाकथित 'गुरुजींवर' आणि त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असलाच पाहिजे!
.
.
.
unePolice #RTOMaharashtra #VIPCulture #NagarPuneHighway #TrafficRules #EqualLaw #PuneNews #SocialMediaViral #मराठीबातम्या
Haveli, Pune | Jun 24, 2026