"पोलीस आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली" उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांचा गंभीर आरोप...
.
.
उरुळी कांचन: "पोलीस प्रशासन आणि शेजारच्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आता माझ्यावर कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली आहे," असा खळबळजनक आणि गंभीर आरोप उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांनी केला आहे. वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने आणि त्यातच पोलिसांकडून असहकार्य किंवा उलट त्रास होत असल्याचा आरोप करत खलसे कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. बळीराजाला आपल्याच हक्कासाठी जर अशा प्रकारे कुटुंबासह मृत्यूला कवटाळण्याची भाषा करावी लागत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून संदीप खलसे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल.
.
.
.
#UruliKanchan | #PuneCrime | #FarmerJustice | #PunePolice | #SandeepKhalse | #MaharashtraFarmers | #UruliKanchanNews | #CrimeNews | #बळीराजा | #मराठीबातम्या
Haveli, Pune | Jun 24, 2026