शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील रांजणगाव गणपती हद्दीतील लांडे वस्ती परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अपघाताची घटना घडली आहे.
पाटस येथून सिमेंटच्या बॅगा भरून भीमाशंकरकडे निघालेला ट्रक रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखालील सुमारे दहा फूट खोल चारीत पलटी झाला.अपघात इतका भीषण होता की ट्रकने रस्त्यालगत उभा असलेला वीज खांब उखडून टाकला आहे.
त्यामुळे वीज तारा तुटून मोठे नुकसान झाले असून परिसरातील चार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असुन
या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
.
.
.
#RanjangaonGanpati #AshtavinayakHighway #TruckAccident #PowerOutage #ShirurNews
#BhimashankarHighway
#LandeVasti
#ShirurTaluka
#PuneAhmednagarHighway
#AccidentProneZone