रामटेक: वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्या दिवशी वन विभाग रामटेक द्वारे कपुर बाहुली रामटेक येथे स्वच्छता अभियान
Ramtek, Nagpur | Oct 3, 2026 वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने रामटेक वनविभागाच्या वतीने रामगिरी पहाडीच्या दक्षिण तळाशी असलेल्या प्रसिद्ध प्राचीन कपूर बाहुली सहित परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी रामटेक राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात आले. ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.