नागपूर शहर: 'बॅरल पब'मध्ये आग ; सीसीटीव्ही मधून झाला भलताच खुलासा, मास्टर शेफ सह दोघांना अटक
9 सप्टेंबर ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध 'बॅरल पब'मध्ये झालेल्या वादातून एका मास्टर शेफने आपल्या साथीदारासह पबमध्ये पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण आगीत सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.मनमोहन तिवारी आणि शुभम श्रीकृष्ण विश्वकर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या आगीत पबमधील सुमारे ९ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.मुख्य आरोप