घनसावंगी: जरांगे यांचे वजन ७ किलोने घटले; प्रकृती खालावली..
अकराव्या दिवशी पुन्हा उपचार सुरू; रात्री २.३० वाजता सलाईन देण्यात आले
जरांगे यांचे वजन ७ किलोने घटले; प्रकृती खालावली.. अकराव्या दिवशी पुन्हा उपचार सुरू; रात्री २.३० वाजता सलाईन देण्यात आले.. आज दिनांक 8 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असून, त्यांचे वजन तब्बल ७ किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार दिवसांपासून जरांगे पाटील यांनी सलाईन, पाणी तसेच औषधोपचार घेणे बंद केले हो