घनसावंगी: राजणी येथे एकाच रात्री दोन दुकाने फोडली ; पोलिसांनी पेट्रोलिंग करावी ग्रामस्थांची मागणी
राजणी येथील एस. के. मेन्स वेअर तसेच पांडुरंग मांडवे व नारायण मांडवे यांच्या सोन्या–चांदीच्या दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी फोड केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. मागील काही काळापासून व्यापारी महासंघामध्ये एकजूट नसल्यामुळे तसेच पेट्रोलिंगअभावी लहान–मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी झालेल्या चोऱ्यांबाबत जर प्रत्येक व्यापाऱ्याने वेळेवर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असती, तर कदाचित आजची ही घटना टाळता आली असती.