मतदारसंघातील आमदार हिकमत दादा उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काकडे कंडारी येथील गजानन काकडे, बाळासाहेब काकडे,बाळासाहेब प्रल्हाद काकडे, कृष्णा काकडे या युवकांनी आज जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार हिकमत दादा उढाण यांनी सर्व युवकांचे शिवसेना परिवारात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.