कळमेश्वर: राम मंदिर गोंडखैरी येथे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी साधला नागरिकांशी संवाद
नवरात्रीनिमित्त नवयुवक रास गरबा उत्सव समिती, गोंडखैरी यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित भव्य रास गरबा कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांशी संवाद साधला व नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आई जगदंबेच्या भक्तीत रंगलेला गरब्याचा जल्लोष, पारंपरिक संस्कृतीचे दर्शन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे उत्सवाचे वातावरण मंगलमय झाले होते.