कळमेश्वर: कळमेश्वर येथील यश वेल्डिंग वर्कशॉप मध्ये भर दिवसात 13 लाखांची चोरी
कळमेश्वर शहरातील यश वेल्डिंग वर्कशॉपमध्ये भरदिवसा तब्बल १३ लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुकान व व्यावसायिक आस्थापनांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याची गरज आहे