भिवापूर: भिवापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा करण्यात आला दौरा
आज भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, सालेभट्टी दंदे, उरकुडापार, पांजरेपार, नांद, वणी आणि धामणगाव (गवळी) या दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.सोयाबीन, धान, कापूस तसेच जिरायती व बागायती पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. सततची नापिकी, प्रतिकूल हवामान आणि पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आर्थिक अडचण ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे.