महाड: महाडमधील प्रसिद्ध व्यापारी कदम बंधूंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
Mahad, Raigad | Nov 28, 2025 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाडमधील प्रसिद्ध व्यापारी कदम बंधू यांनी आपल्या कुटुंबासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला नगरपालिका निवडणुकीचे उमेदवार, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.