दुचाकीत छुपी जागा तयार करून अवैध दारू वाहतूक; गडचिरोली पोलिसांची कारवाई!
गडचिरोली–चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ नाकाबंदीदरम्यान गडचिरोली पोलिसांनी दुचाकी वाहनांच्या पेट्रोल टँक व सीटमध्ये छुपी जागा तयार करून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली.
तपासणीत दोन दुचाकींमधून 400 देशी दारूच्या निपा आढळून आल्या. दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 02 दुचाकींसह एकूण ₹2.32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या सीमांवर सुरू असलेल्या 24 तास नाकाबंदीच्या माध्यमातून अवैध दारू वाहतूक व इतर अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सातत्याने सुरू आहे.
छुपी पद्धत कोणतीही असो… अवैध व्यवसायांवर कायद्याची नजर कायम!
#GadchiroliPolice #IllegalLiquor #PoliceAction #CrimePrevention #Gadchiroli
149 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 19, 2026