राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोलीचा गौरवशाली सहभाग… 200 C-60 जवानांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी एकतानगर (केवडिया), गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या 200 C-60 जवानांनी शिस्तबद्ध संचलनातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
गेल्या दीड महिन्याच्या कठोर सरावानंतर राष्ट्रीय स्तरावरील या परेडमध्ये सहभागी होऊन परतलेल्या सर्व अधिकारी व जवानांचा पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
माओवादविरोधी अभियानांतील शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या C-60 जवानांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यात सहभाग नोंदवत गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यपरंपरेचा सन्मान राखला.
शौर्याची परंपरा… शिस्तीची ओळख… राष्ट्रीय एकतेचा अभिमान!
गडचिरोली पोलीस — राष्ट्रसेवेसाठी सदैव कटिबद्ध.
#GadchiroliPolice #C60 #RashtriyaEktaDiwas #NationalUnityDay #EktaParade SardarVallabhbhaiPatel MaharashtraPolice
83 views | Gadchiroli, Maharashtra | Nov 5, 2026