माओवादमुक्त गडचिरोलीत दिवाळीचा आनंदोत्सव… पोलीस आणि नागरिकांनी एकत्र उजळले विश्वासाचे दिवे!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 08 नोव्हेंबर 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील 70 पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांमध्ये ‘माओवादमुक्त दिवाळी’ उत्साहात साजरी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी अतिदुर्गम बिनागुंडा येथे नागरिक व जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विविध दुर्गम भागांतील नागरिकांच्या आनंदात सहभाग घेतला.
नवजीवन वसाहतीतील आत्मसमर्पित सदस्यांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक सलोखा आणि आपलेपणाचा संदेश देण्यात आला. तसेच सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने दुर्गम भागातील गरजू शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य व फराळाचे वाटप करण्यात आले.
ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे, तर शांतता, विश्वास, सुरक्षितता आणि नव्या आशेची!
माओवादमुक्त गडचिरोली… सुरक्षित गडचिरोली… आनंदी गडचिरोली!
#GadchiroliPolice #MaoistFreeGadchiroli
386 views | Gadchiroli, Maharashtra | Nov 9, 2026