माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य जप्त!
गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाने वांगेतुरी पोलीस स्टेशन हद्दीतील माचुवंचा जंगल परिसरात शोध अभियान राबवून माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य हस्तगत केले.
अभियानात 12 क्लेमोर, 01 बाराबोअर रायफल, 03 सिंगल शॉट रायफल, 01 एअर गनसह एकूण 05 अग्निशस्त्रे, तसेच स्फोटक साहित्य, वायरलेस माईक सेट, 100 सुतळी बॉम्ब, माओवादी गणवेशाचे कापड व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. धोकादायक स्फोटक व इतर माओवादी साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल व BDDS पथकातील जवानांनी संयुक्तपणे पार पाडली.
सतर्कता • शौर्य • सुरक्षितता
गडचिरोली पोलीस — नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध!
#GadchiroliPolice #C60 #BDDS #PoliceAction #Gadchiroli MaharashtraPolice
46 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 28, 2026