श्रमदानातून उभारला पूल… अतिदुर्गम बिनागुंडाच्या नागरिकांसाठी सुकर झाला प्रवास!
बिनागुंडा–लाहेरी मार्गावर पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्याने नागरिकांची ये-जा ठप्प होणे, गावांचा संपर्क तुटणे तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि वैद्यकीय मदतीत अडथळे निर्माण होत होते.
नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेत पोलीस मदत केंद्र बिनागुंडा, CRPF, SRPF, C-60 जवान आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून 60 मीटर लांबीचा नवीन पूल उभारला. ट्रॅक्टर, JCB आणि 08 पाईपच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या या पुलामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास आता अधिक सुलभ झाला आहे.
यापूर्वीही अतिदुर्गम नेलगुंडा येथे नागरिकांच्या सहभागातून अशाच प्रकारे पूल उभारण्यात आला होता.
सुरक्षेच्या पलीकडे सेवेचे नाते…
श्रमदानातून पूल उभारला, विश्वासाने मने जोडली!
गडचिरोली पोलीस — नागरिकांच्या सुरक्षा आणि विकासासाठी सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #Binagunda #CommunityPolicing #Shramdan #PoliceForPeople C60 PublicService Gadchiroli MaharashtraPolice