रामटेक: देवलापार - वडंबा मार्गावर दुचाकीचालक अपघातात जखमी
Ramtek, Nagpur | Sep 12, 2026 पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील देवालापार - वडंबा दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा अपघात होऊन तो जखमी झाल्याची घटना बारा सप्टेंबरला सकाळी घडली. यात दुचाकी क्रमांक एम एच 40 झेड 37 75 चे बरेच नुकसान झाले. जखमी दूचाकी चालकाला ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे उपचारार्थ भरती करण्यात आले.