हिंगणा: इसासनी येथे माननीय केंद्रीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप
Hingna, Nagpur | May 24, 2026 हिंगणा मतदारसंघातील ईसासनी येथे "महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व लायन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी" यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई मशीन वितरण कार्यक्रम केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी साहेब यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी गरजूना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. मा. गडकरी साहेबांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करून कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.