रामटेक: रामटेक येथे फसवणूक करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुद्देमाल जप्त
Ramtek, Nagpur | Sep 1, 2026 पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत भिक्षा मागताना नागरिकांची फसवणूक करून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्या प्रकरणी रामटेक पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 100% मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एक सप्टेंबरला रामटेक पोलिसांनी दिली.