जाफराबाद: आरदखेडा फाट्यावर तिहेरी अपघात, रिक्षा चालकाचा मृत्यू
आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ते माहोरा या मुख्य मार्गावरील आरदखेडा फाट्यावर मिरचीची वाहतूक करणारा आयशर एमएच-20 सीसी 3025 या वाहनाचा रिक्षाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे हा तिहेरी अपघात असून यामध्ये रिक्षा अपघात झाल्यानंतर दुचाकी ला जाऊन धडकली यामध्ये रिक्षा चालक संदीप जगताप यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी वरील गणेश पंडित व विकास पंडित हे गंभीर जखमी आहे.