नागपूर शहर: बाबा दीप सिंह नगरात युवकाचे अपहरण व मारहाणीचा प्रयत्न; मारहाणीची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
9 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा दीप सिंह नगरात एका कार्यालयात घुसून अनिकेत नवरंग गणवीर या युवकाला मारहाण करण्यात आली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि कारमध्ये बसवून अपहरणाचा प्रयत्न झाला. जग्गा रंधावा व त्याच्या साथीदारांवर या घटनेचे आरोप करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पीडित युवकाने संताप व्यक्त केला असून, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पीडित युवकाने दिली आहे