नरखेड: ग्रामपंचायतीच्या विकासकामात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार; माजी सदस्याचा गंभीर आरोप
Narkhed, Nagpur | Aug 24, 2026 ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याचा गंभीर आरोप कुमरिया मायवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेश रतनलाल कुमेरिया यांनी केला आहे. प्रत्यक्ष कामाची पाहणी करून त्यांनी संबंधित यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.माजी सदस्य राजेश रतनलाल कुमेरिया यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर व कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असून, तिथे मुरुम टाकण्यात आला असल्याचे सांगितले.