जाफराबाद: सिपोरा अंभोरा येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या शेती पिकांची काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी केली पाहणी
आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा येथे काँग्रेसचे जाफराबाद तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जात पावसाळा अभावी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली आहे व शेतकऱ्यांची संवाद साधत सरकारने या शेतकऱ्यांना तात्काळ धीर देण्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा कारण मागील 45 दिवस झाले पाऊस पडला नाही त्यामुळे खरीप पिके होत्याची नव्हती झाली असून सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.