रामटेक: आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रामटेक शहरात पोलिसांचे रूटमार्च व मॉकड्रिल
Ramtek, Nagpur | Sep 7, 2026 आगामी पोळा, गणेशोत्सव, हाडपक गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन या सणादरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहावी व उत्सव भयमुक्त व्हावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोतदार यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक रमेश बरकते यांचे नेतृत्वात सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सायं. साडेपाच वाजता रामटेक शहरात रूटमार्च काढण्यात येऊन गांधी चौक, बस स्टँड चौकात मॉक ड्रिल घेण्यात आली.