नागपूर शहर: नागपुरातअमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई: दीड लाखांचे एमडीसह दोन जण जेरबंद
11 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १ लाख ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून १७.४०० ग्रॅम एमडी पावडर, दोन मोबाईल व एक दुचाकी असा एकूण १,६२,२०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.सुनील हरबंसलाल जुनेजा आणि अतुल दिलीप शेंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे.