कळमेश्वर: गोंडखैरी येथे ५४ वर्षीय व्यक्तीचा गळफास घेऊन मृत्यू; पोलीस व ॲम्बुलन्स घटनास्थळी
२८ सप्टेंबर रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी, वॉर्ड क्रमांक २ येथे एका ५४ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना समोर आली. मृत व्यक्तीचे नाव राजेश यशवंत सहारे (वय ५४), रा. गोंडखैरी, वॉर्ड क्रमांक २ असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत असून, त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.