डोंबिवलीतील निळजे लोढा परिसरात KDMC चा अतिक्रमणांवर बुलडोझर!
इ प्रभाग कार्यालयामार्फत आंबेडकर चौक ते गावदेवी चौकापर्यंत धडक कारवाई; तब्बल ३० हजार ७५० चौरस फुटांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त, दुकानदारांचे अनधिकृत बांधकाम हटवले!
फुटपाथ केले अतिक्रमणमुक्त ,
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'ई' प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत डोंबिवलीतील निळजे लोढा परिसरात अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आंबेडकर चौक ते काळुबाई चौक, भवानी चौक, शिवाजी चौक ते गावदेवी चौक या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान दुकानांसमोरील अनधिकृत प्रोजेक्शन, वाढीव बांधकामे, शेड तसेच सार्वजनिक पदपथ आणि रस्त्याच्या जागेवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. या मोहिमेत अंदाजे ३० हजार ७५० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले.या कारवाईमुळे परिसरातील पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे होण्या
Kalyan, Thane | Nov 17, 2026