📍डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक रस्ता चौपदरीकरणासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर
लातूर : लातूर शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रेणापूर नाका ते गरुड चौक रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते निधी (CRIF) अंतर्गत तब्बल ₹३८ कोटींचा निधी मंजूर झाला असून, हा निधी मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
लातूर शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता वाहनांचा ताण आणि नागरिकांना होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सातत्याने शासनाकडे लावून धरली होती. यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन केंद्रीय रस्ते निधीतून (CRIF) निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.
तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन निधी मंजुरीसंदर्भात निवेदन सादर केले होते. संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क ठेवत केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत अखेर या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी ₹३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमुळे नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक हा मार्ग अधिक रुंद, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुलभ होणार आहे. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून लातूरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या, "लातूरच्या विकासासाठी मिळवलेला प्रत्येक निधी हा जनतेच्या हिताचा आहे. रेणापूर नाका ते गरुड चौक रस्ता चौपदरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून याचा लाभ हजारो लातूरकरांना होणार आहे. लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही अधिक वेगाने सुरू राहतील."
या निधीस मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच श्री.अमोल पाटील कौळखेडकर (स्वीय सहाय्यक मा.नितीन जी गडकरी)यांचे डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.
Latur, Latur | Nov 7, 2026