Public App Logo
Profile Picture

द महाराष्ट्र न्यूज

@dgiri8187
302Followers
0Following
📍बोलाचा भात आणि बोलाची कढी.

📍लातूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

लातूर : लातूर चा पाणी प्रश्न,शहरातील रस्त्यांवरील खड्डे, रिंगरोडची दुरवस्था, गल्लीबोळातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच रस्त्यालगत पार्किंगविना उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या इमारती आणि महानगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील हॉस्पिटल्सच्या कारभाराबाबतही नागरिकांकडून तक्रारी होत आहेत.

या विविध समस्यांकडे पालकमंत्री आणि शहराच्या आमदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लातूरकरांच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्या मर्यादेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Video 1
📍बहुतांशी मागण्या मान्य करून घेतल्या हे सर्व श्रेय मनोज जरांगे यांचे -मंत्री विखे पाटील
📍मनोज जरांगे यांच उपोषण मागे
📍पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आज लातुरात.
📍लातूर च्या पाणी प्रश्नावर होणार निर्णय.
📍ज्यांच्यामुळे मराठवाड्याला मुक्ती मिळाली त्या मुक्तिसंग्रामाचे खरे योद्धे भाई बन्सीलालजी, भाई शामलाल जी यांना आणि या न्यायाच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्व योध्याना विनम्र अभिवादन

📍 मराठवाडा मुक्ती संग्रामापासून जनतेला बोलाचा भात आणि बोलाची कडी देऊन सांत्वन करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आणि धन दांडग्या नेत्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
📍लातुरात शांतता सुसंस्कृत पणा आबादित ठेवणारे आहेत कुठे..?
📍लातुरात गुटखा खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या दोघावर धारदार शस्त्रणे वार एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी.
अनधिकृत कब्जा करून मूळ मालकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे काम लातूर शहरात सुरू या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजा मणियार यांची पत्रकार परिषद
Video 8
मांजरा धरणात किती पाणी
📍 दुष्काळ परिस्थिती त गोरगरिबां च्या राशन चीं मारामार .
 जिल्हा पुरवठा विभागाचा हा किती भोंगळ कारभार. 1351 दुकानांपैकी 173 सह लातूरात 26 बंद.
📍 यावर जिल्हा पुरवठा विभाग आपली भूमिका स्पष्ट करेल काय..?
📍 लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही तर दुष्काळच येणाऱ्या रब्बी हंगामासाठी लागणारे बी बियाणे पुरविण्यासाठी सरकारकडे आग्रह धरणा- माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर
📍जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपाली शाम भोसले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा.
📍सरकारने लातूर सह मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून कोरडवाहू शेतकऱ्यांना 1लाख तर बागायतदार शेतकऱ्यांना 1.50 लाख रुपयाची मदत करा.-जि प सदस्य दिपाली भोसले यांची मागणी.
📍बाप्पांचे आगमन आणि पोलीस ऍक्टिव्ह मोड वर...
    वादग्रस्त प्लॉट वरील तक्रारीचा निपटारा करण्यात एमआयडीसी पोलीसांनी दाखवली तत्परता.

📍 खऱ्या प्लॉट धारकांना बाहेर काढलं सत्य काय..?
Breaking..
लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी गोळी झाडून घेऊन संपवले जीवन .
📍सुरक्षित अन्नाबाबत जनजागृती करणारा देखावा
तुकाराम मुंडे यांच्या कार्यप्रेरणेतून ‘सुरक्षित अन्न सर्वांसाठी’ या विषयावर जनजागृती करणारा प्रबोधनात्मक देखावा आयोजित करण्यात आला आहे.
हा देखावा एस.टी. वर्कशॉप शेजारी, आंबेजोगाई रोड, लातूर येथे ‘आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन’ यांच्या वतीने सादर करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुरक्षित अन्नाबाबत जनजागृतीचा संदेश घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
📍 लातूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर लातूर मनपा लातूर पोलीस लातूर महसूल प्रशासन मिळून करणार संयुक्त कार्यवाही- जिल्हाधिकारी भारत बाष्ठेवाड
स्पोर्ट कोट्यातून झालेल्या भरती प्रकरणी बनावट प्रमाणपत्र देऊन  नोकरी मिळवणाऱ्या ची आता खैर नाही.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
📍 30 सप्टेंबर नंतर दुष्काळासंदर्भात शासन योग्य निर्णय घेईल आम्ही शासन दरबारी आमचा अहवाल सादर करू, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असली तरी मुबलक सारा उपलब्ध आहे - जिल्हाधिकारी भारत बाष्ठेवाड
📍उदगीर सशस्त्र लूटप्रकरणाचा छडा; दोघे ताब्यात

८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण

उदगीर : नवा मोंढा परिसरातील चौधरी ट्रेडर्सच्या मालकाला कत्ती व स्प्रेचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली बॅग लुटल्याप्रकरणी लातूर स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

विजय शिवाजी बारहाळे (२४, रा. हाळणी, ता. मुखेड) आणि गोविंद राजेंद्र अटकळे (२१, रा. हाळणी, ता. मुखेड, ह.मु. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ३२ हजार रुपये रोख, तपकिरी रंगाची बॅग व संबंधित साहित्य तसेच चोरीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, असा एकूण ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

९ सप्टेंबर रोजी उदगीर येथील नवा मोंढा परिसरात ही लूट झाली होती. तपासादरम्यान आरोपींचा या घटनेशी संबंध असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उदगीर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
📍सर्व लातूरकरांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तिची निवड करावी. -जिल्हाधिकारी भारत बाष्टेवाड
📍अंबेजोगाई रोड, सावली हॉस्पिटल जवळ falcons जिम च्या इमारती ला पार्किंग नाही. अगदी रोड टच बांधकाम महापालिकेनी आर्थिक देवान घेवाण करून परवाना दिल्याची चर्चा.
मनपा आपली भूमिका स्पष्ट करणार का..?
📍📍लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचे भीषण संकट; १४५ प्रकल्प मृतसाठ्यात

खरीप हंगाम हातातून गेला; सोयाबीनचे १०० टक्के नुकसान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर — आ. संभाजी पाटील निलंगेकर

लातूर, दि. १२ सप्टेंबर २०२६ : लातूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती नसून दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेती व्यवस्था मोठ्या संकटात सापडली असून, खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. सोयाबीन पिकाचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्याचबरोबर आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीतीही वाढली आहे, असे माजी मंत्री तथा भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्ह्यातील १४५ प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने उपलब्ध जलसाठा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची वेळ आली असून, शिल्लक पाणी सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगाने शासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन तर बुडालेच, पण पुढील हंगामासाठी लागणारे भांडवल, कर्जफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांचेही मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, शेतकऱ्यांना योग्य आणि पुरेशी मदत मिळावी यासाठी शासन सकारात्मक असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली
शेतीसोबतच दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम पिण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता आहे. जलसाठे मृतसाठ्यात गेल्याने भविष्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे निलंगेकर यांनी नमूद केले.

शाश्वत पाण्यासाठी वॉटर ग्रीड
लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला भविष्यातील पाणी संकटापासून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र सध्याचे दुष्काळाचे संकट तातडीने हाताळण्याची गरज आहे. शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शासनाने मदत व उपाययोजनांना वेग द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुष्काळाच्या या गंभीर परिस्थितीत सर्व लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्याला या दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी मिळून प्रयत्न करणार, असा विश्वासही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला.
📍हेल्मेट वापरा.. आपघात सांगून होत नाही थोडक्यात वाचली 😳
 <nis:link nis:type=tag nis:id=favebookpost nis:value=favebookpost nis:enabled=true nis:link/> 
 <nis:link nis:type=tag nis:id=facebookviral nis:value=facebookviral nis:enabled=true nis:link/> 
 <nis:link nis:type=tag nis:id=facebookreelsviral nis:value=facebookreelsviral nis:enabled=true nis:link/> 
 <nis:link nis:type=tag nis:id=facebookpage nis:value=FacebookPage nis:enabled=true nis:link/> 
 <nis:link nis:type=tag nis:id=maharashtranews nis:value=MaharashtraNews nis:enabled=true nis:link/>
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची लातूर जिल्हा दुष्काळसदृषय परिस्थिती बाबत पत्रकार परिषद.