शहादा: गणेश नगरातील विवाहितेचा सुरत येथे सासरच्या मंडळींकडून ५ लाखासाठी शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी शहदा पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा शहरातील शनी मंदिराजवळील गणेश नगरातील विवाहितेचा सुरत येथे सासरच्या मंडळींकडून लग्नात कमी हुंडा दिला व मानपान दिला नाही या कारणावरून माहेरून ५ लाख रुपये आणावेत या कारणासाठी वारंवार मानसिक व शारीरिक स्थळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या ६ जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.