शहादा: मोहीदा शिवारातील विद्युत रोहित्रातून १९ हजारांचे १८० लिटर ऑईल व ११ हजारांची ५८० मीटर तार लंपास, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील मोहीदा गावाच्या शिवारातील विद्युत रोहित्रातून ऑईल आणि तार चोरी झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. चोरट्यांनी या रोहित्रावरील १९ हजार ८०० रुपयांचे १८० लिटर ऑईल आणि ११ हजार ६०० रुपयांची ५८० मीटर ॲल्युमिनिअमची तार लंपास केली. याप्रकरणी महावितरण प्रधान तंत्रज्ञ चतुर नेरपगार यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.