शहादा: टेंभली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली
शहादा तालुक्यातील टेंभली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद आयोजित करून खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडली.शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोणखेडा केंद्राच्या केंद्रप्रमुख अलका जयस्वाल यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून शहादा बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल , नंदुरबार डायटच्या अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार, म्हसावद डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या भावना पाटील आदी उपस्थित होते.