शहादा: म्हसावद येथील किराणा दुकानातून ३३ हजार २२० रुपयांचा गुटखा जप्त, पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील नितीन बाबुलाल जैन नाकोडा किराणा दुकान आहे. परंतू या किराणा दुकानातून नितीन जैन यांनी गुटखा व तंबाखुसाठा बाळगून विक्री करीत होते. म्हसावद पोलिसांनी दुकानात धाड टाकून तपासणी केली असता १३ हजार ६८ रुपयांचे विमल पानमसाल्याचे ६६ पाऊच, १८ हजार ७०० रुपयांचा केसरयुक्त विमल पानमसाल्याचे १०० पाऊस, १४५२ रुपयांचे व्ही - १ तंबाखुचे ६६ लहान पुड्या असा एकुण ३३ हजार २२० रुपयांचा गुटखासाठा जप्त करण्यात आला आहे.