पालघर: सफाळे - पारगाव परिसरात दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, एकजण जखमी
पालघर तालुक्यातील सफाळे- पारगाव परिसरात दुचाकीचा विषय असा अपघात घडला आहे. दुचाकीस्वार दोघेजण जात असताना भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी एका झाडाला आदळली. या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे तर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. रोहित बुजड असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून कल्पेश लाखात हा जखमी झाला आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 106 (1) 281, 125 (अ)(ब), मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.