पालघर: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश यांनी दिले होते. त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदर डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,जि प मुख्य कार्यकारी मनोज रानडे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.