पालघर: वाघाडी येथे महिला पर्यटक नदीत बुडाली
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाघाडी येथे एक महिला पर्यटक नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. भीम बांध येथे पर्यटनासाठी आलेली महिला बांधाच्या वरच्या भागातून थेट पाण्यात उतरले मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात ओढले गेली. कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व नदीत बुडालेल्या महिलेचा शोध सुरू करण्यात आला. मीना पराड असे नदीत बुडालेल्या महिलेचे नाव आहे.