पालघर: जिल्हा पोलीस दलाचा शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमात प्रथम क्रमांक आल्याबद्दल आनंद; पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील
मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. सर्वसामान्य जनतेला प्रत्येक विभागाकडून कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला हवा, त्याचे काम सहजपणे कसे व्हावे आणि सर्वसामान्य लोकांचे सुकर जीवनमान कसे व्हावे, प्रत्यक्षात काय प्रभाव आहे याबाबत सर्वेक्षण करण्यात आले त्यानंतर पालघर जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. या याबाबत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.