कळमेश्वर: खाकी वर्दीचा वापर जनतेच्या रक्षणासाठी नाही,तर जनतेचा आवाज दाबण्यासाठी होत आहे - कुंदा राऊत
आज खाकी वर्दीचा वापर जनतेच्या रक्षणासाठी नाही, तर जनतेचा आवाज दाबण्यासाठी होत आहे - कुंदा राऊत (माजी उपाध्यक्ष नागपुर जिल्हा परिषद यांचा आरोप! माहुरझरी टी पांईट वर दररोज होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज कांग्रेस पक्षाच्या वतीने तसेच माहुरझरी गावच्या नागरिकांंनी रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. वारंवार पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही या ठिकाणी गतीनियंत्रणावर कोणतेही बंधन नाही तसेच या ठिकाणी वाहतुक पोलीस नाही सिग्नल नाही, स्पीडब्रेकर नाही.