कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये सायबर फसवणुकीत वाढ; पोलीस अधीक्षकाचा नागरिकांसाठी महत्त्वाचा सायबर सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी तीन महत्वाचे नियम पाळण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र शासनाच्या सायबर जागरूकता महिन्याच्या मोहिमेअंतर्गत हा इशारा दिला जात आहे.