Sujat Ambedkar On Pune Police : तुम्ही पर्मनंट आहात, सरकार पर्मनंट नाही!’ सुजात आंबेडकरांचा पुणे पोलिसांना इशारा?
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.
आंदोलन करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना वंचितकडून मोफत कायदेशीर मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
‘हे दडपशाहीचे सरकार आहे,’ अशी टीका करत सुजात आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, ‘तुम्ही पर्मनंट आहात, सरकार पर्मनंट नाहीये,’ असे म्हणत सरकार बदलल्यास परिस्थितीचा विचार करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
#SujatAmbedkar #MPSC #MPSCAandolan #MPSCStudents #VanchitBahujanAghadi PuneNews StudentProtest MaharashtraPolitics PunePolice BreakingNews
Pune City, Pune | Oct 11, 2026