Pune पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय! पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर; PMC च्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह?
पुणे : शहरात एकीकडे पाण्याची कमतरता जाणवत असताना आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या या मोठ्या अपव्ययामुळे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देणाऱ्या प्रशासनाकडूनच पाण्याची गळती रोखण्यासाठी पुरेशी तत्परता दाखवली जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत आहे.
Video Credit : @ar_cinematics19
Pune City, Pune | Nov 22, 2026