कळमेश्वर: मधुगंगा परिसरात बिबट्याचा वावर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
कळमेश्वर तालुक्यातील मोहपा शहरातील मधुगंगा नदीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास काही मुलांना तेथे बिबट्या दिसून आला तरी नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा करण्यात आलेला आहे